News - गांधी उद्यानाचे पुनर्निर्माण भूमिपुजन

नजिकच्या काळात गांधी उद्यानाचा कायापालट- अशोक जैन

जळगाव, दि. 1 मे 2017 (प्रतिनिधी) - गांधी उद्यान पुनर्निर्माण भूमीपुजन 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पार पडला. महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त जीवन सोनवणे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन या मान्यवरांच्याहस्ते औपचारिक पूजा करून, मान्यवरांच्या शुभहस्ते कुदळ मारून झाले.

काव्यरत्नावली चौकात अबाल वृद्धांसाठी अद्ययावत असे भाऊंचे उद्यान साकारले त्याच प्रमाणे शहरातील मध्यभागी असलेल्या गांधी उद्यानाचे देखील पुनर्निर्माण होत आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि, तसेच भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी मानून हे पुनर्निर्माण होत आहे. या सोहळ्यास महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती सौ. वर्षाताई खडके, माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, नगरसेवक अमर जैन, सुनील माळी, श्यामकांत सोनवणे, शरद तायडे, आर्टिटेक्ट शिरिष बर्वे, बांधकाम व्याय सायिक अनिस शाह, नगर अभियंता सुनील भोळे, फारुख शेख, उदय महाजन व सहकारी उपस्तित होते. गांधी उद्यान हे 4 एकर जागेवर आहे.

जैन इरिगेशनच्यावतीने या उद्यान देखील जीमची सुविधा, विशाल जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळणी, व्यायामाची उपकरणे यासारख्या महत्त्वाच्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गांधी उद्यानाचे नवे रूप नजिकच्या काळात शहरवासियांना बघायला मिळेल.

 

 

 

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved