News - ‘सकल जैन श्रीसंघा’तर्फे गो-पूजन

पांझरपोळ गोशाळेत गो-पूजन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर. योवळी उपस्थित संघपती सेवादास दलिचंद जैन, गिरधरलाल ओसवाल, डी. एम. जैन, अशोक जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा.

जळगाव (प्रतिनिधी) दि.12 : श्रद्धेय मोठेभाऊंच्या वाढदिवसानिमित्त ‘सकल जैन श्रीसंघा’च्या वतीने पांझरपोळ गोशाळेत गो-पूजन, भाऊंच्या स्मृतीत वृक्षारोपण आणि लापसी दान करण्यात आले. याप्रसंगी संघपती सेवादास दलिचंद जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी महापौर नितिन लढ्ढा, स्वरूपचंद कोठारी, डॉ.सुभाष चौधरी, गिरधारीलाल ओसवाल, डी.एम. जैन, नारायणराव वाणी, अशोक धूत आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

यावेळी उपाध्यक्ष अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, अथांग जैन, सौ.ज्योती जैन, निशा जैन, शोभना जैन, डॉ.भावना जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य, माजी उपमहापौर विष्णू भंगाळे, शंकरलाल कांकरिया, मुकेश ललवाणी, वसंत सुराणा, दिलीप गांधी, नगरसेवक अमर जैन, सुरेंद्र लुंकड, सीए. तेजेस कावडीया यांच्यासह जैन श्रीसंघातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करतांना भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. शेती, शाळा, उद्योग, पर्यावरण यात शाश्वत विकासासाठी कठोर परिश्रम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मोठेभाऊ, असे सांगत शासनातर्फे त्यांनी भाऊंना अभिवादन केले. संघपती सेवादास दलिचंद जैन, डॉ. सुभाष चौधरी, दिलीप गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले. दलिचंद जैन म्हणाले की, भाऊ प्रत्येक गोष्टींचा व्यवस्थीत अभ्यास करून त्याचे चिंतन करीत काळ, वेळेनुसार त्यात बदल करून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत. पांझरपोळसह अनेक संस्थाचा यातूनच भाऊंनी विकास केला असल्याचे दलिचंद जैन म्हणाले. भाऊंनी दिलेले गो-सेवेचे व्रत जैन परिवार जपत असल्याने दीपक गांधी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मनोज लोढा, सचिन चोरडिया, विशाल चोरडिया, विजय सांड, अनिल पगारिया, विपिन चोरडिया, श्रेयस कुमूट नरेंद्र बंब, मुकेश सुराणा, प्रविण खिवसरा, रूपेश मुनोत यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन संजय रेदासनी व महेश मुनोत यांनी केले.

भाऊंच्या स्मृतीत वृक्षारोपण करतांना केल्यानंतर उपस्थित मान्यवर.
 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved