News - जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा येथे भवरलालजी जैन यांच्या पुतळ्याचे अनावरण

जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा येथे पुतळ्याचे अनावरण करताना दलुभाऊ जैन, विजय सिंग पाटील, डी.एम. जैन, गिरधरीलाल ओसवाल, अथांग जैन, डॉ. सुभाष चौधरी, अजित जैन, अशोक जैन, अजित जैन, अतुल जैन

जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुतळ्याचे अनावरण जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा येथे करण्यात आले. सेवादास दलुभाऊ जैन, गिरिधारीलाल ओसवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, डी. एम. जैन, ए. एस. आजगांवकर, आर. स्वामीनाथन, एस.व्ही. पाटील, डॉ. बाला, डॉ. ढाके, डॉ. बालकृष्ण, डॉ. सुभाष चौधरी, अभय जैन, अविनाश जैन, सौ. ज्योती, सौ. निशा, सौ. शोभना, डॉ. सौ. भावना जैन, आनंद गुप्ते, अमर जैन, गिमी फरहाद, सौ. कल्याणी मोहरीर, विजयसिंग पाटील तसेच जैन परिवारातील सर्व सदस्य यासह जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

प्रारंभी अनिल जैन यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमात अजित जैन यांनी टिश्युकल्चर आणि भवरलालजी जैन यांची शेतकऱ्यांच्याप्रती या उच्च कृषीतंत्रज्ञानाप्रती असलेली आस्था आणि टिश्युकल्चर विभागाच्या विकासाबाबत तसेच भविष्यातील योजनेबाबत सविस्तर विचार मांडले. जग झपाट्याने बदलत आहे. शेतीचे क्षेत्र कमी होत आहे त्यामुळे व्हर्टिकल शेती, मातीशिवाय शेती, पाणी, हवा किंवा माती ऐवजी अन्य मिडीया वापरून शेती करणे अपरिहार्य ठरणार आहे त्याबाबत देखीलत यांनी वेध घेतला. सर्व फळझाडांचे टिश्युकल्चर, भाजीपाल्याचे रोपेच बनवून शेतकऱ्यांना देण्याची योजना पुढे येईल असे भाऊंचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी डॉ. भवरलालजी जैन यांच्या नावे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे प्रतिनिधीक वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी तर पसायदान आणि राष्ट्रगीत गायन दिपक चांदोरकर यांनी केले.

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved