News - भाऊंचे उद्यानात साकारलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

भाऊंच्या उद्यानात आनंद पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाचे दीप प्रज्ज्वलन करताना संघपती दलूभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी, चित्रकार आनंद पाटील, तुकाराम पाटील.

श्रद्धेय पद्मश्री डॉ.भवरलाल जैन यांना चित्र प्रदर्शनाव्दारे ‘चित्रपुष्पांजली’

जळगाव (प्रतिनिधी) दि. 12 :- श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भाऊंचे उद्यान ‘चित्ररूपात’ साकारण्यात आले. या चित्ररुपी प्रदर्शनाचे उदघाटन संध्याकाळी सेवादास दलूभाऊ जैन, गिरधरभाऊ ओसवाल, डी. एम. जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अथांग जैन, गिमी फराद, आनंद गुप्ते, डॉ. सुभाष चौधरी व परिवारातील सर्व सदस्यांच्या हस्ते भाऊंच्या उद्यानात करण्यात आले.

उदघाटनानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संघपती दलूभाऊ जैन, गिरधर ओसवाल, डी. एम. जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी यांचे स्वागत तुकाराम पाटील यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना दलूभाऊ जैन यांनी आनंद पाटील यांच्या चित्रांचे कौतुक केले. ते म्हणाले कलावंतांची कलानिर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला हवे. भाऊंच्या उद्यानात अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आनंद पाटील यांनी पहाटेच्या वेळी भाऊंच्या उद्यानात बसुन ही चित्रे काढली आहेत. यावेळी गिमी फराद यांनी मोठ्या भाऊंच्या चित्रात रंग भरण केले.

प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केले. हरूण पटेल यांनी सुत्रसंचालन केले. आनंद पाटील यांनी आभार मानले. जैन इरिगेशन मधील सहकारी आनंद पाटील यांनी काढलेल्या 51 चित्रांचे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील ‘वसंत वानखेडे आर्ट गॅलरी’त भरविण्यात आले आहे.

 

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved