News - उर्दू मुशायरा मध्ये रसिक मंत्रमुग्ध

मनियार बिरादरी आयोजित मुशायऱ्याचे शमा प्रज्वलीत करून उदघाटन करताना जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, करीम सालार, उपमहापौर गणेश सोनवणे, फारूख शेख यांच्यासह मान्यवर.

जळगाव ता. १२ : पद्मश्री भवरलाल जैन यांच्या वाढदिवसनिमित्त महात्मा गांधीजी उद्यानातील ॲम्पी थिएटरमध्ये जिल्हा मुस्लिम बिरादरी तर्फे आयोजित उर्दू मुशायरा रंगला. बऱ्हाणपूर, नासिक, मालेगाव यासह राज्यातील कवी यात सहभागी झाले होते. शमा प्रज्वलीत करून उदघाटन करण्यात आले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, करीम सालार उपस्थीत होते.

संध्याकाळी सुरू झालेल्या या मुशायऱ्यात रंगत आली. मुशायरा मध्ये असगर भुसावली यांनी ‘मेरी हर बात का अफसाना बना देते है’ ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. अफजाल दानीब यांनी ‘सिर्फ इतना चाहता है, ये दिवाना या नबी’, या गझलने उपस्थित श्रोत्यांना दिवाना केले. डॉ. प्रियांका सोनी यांनी गझल आणि शायरीने भवरलालजींचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला. प्रास्ताविक फारूख शेख यांनी केले. सुत्रसंचालन जावेद अन्सारी यांनी केले. हारून उस्मानी, अक्रम कुरेशी, गडबड मालेगाववाला आदी कवी सहभागी झाले होते. करीम सालार मनोगत व्यक्त करताना म्हणाले, भवरलालजी जैन मानवतावादी दृष्टीकोन बाळगुन होते. त्यामुळेच त्यांनी सर्व समाजाला उदारपणे मदतीचा हात दिला आहे. योगीराज गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. मुशायऱ्याच्या यशस्वीतेसाठी मनियार बिरादरीने सहकार्य केले.

 

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved