News - भवरलालजींनी मला पंख दिले !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२ व्या प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणी म्हणून जागतिक किर्तीची विक्रमपटू पॅराशुट जंम्पर (स्कायडायव्हर) पद्मश्री शितल महाजन हिने युवकांना मार्गदर्शन केले. शितलने स्वतःची कहाणी सांगत कशा प्रकारच्या अडचणींवर मात करीत पॅराशुट जंम्पर होण्याचे स्वप्न पूर्ण केले, याची माहिती रोचकपणे दिली. उपस्थित प्रतिनिधींनी जोरदार टाळ्या वाजवून व घोषणा देत शितलला प्रतिसाद दिला.

मूळ जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरींचे नातू कमलाकर महाजन यांची कन्या आहे. ती सन २००४ पासून पॅराशुट जंम्पिग या खेळाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करते. तिचा पॅराशुट जंम्पिग हा खेळ म्हणजे, नियमित उंचीवरुन उडणाऱ्या विमानातून ठरवून जमिनीकडे उडी मारणे. नंतर योग्य त्या उंचीवरुन पॅराशुटचा वापर करीत जमिनीवर उतरणे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन होते.

शितल आपल्या खेळाविषयी आणि प्रारंभाच्या संघर्षाविषयी सांगत होती तेव्हा अशोक जैन यांचा आदराने उल्लेख करीत तीने आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग सांगितला. जळगावच्या जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्रध्देय डॉ. भवरलाल जैन यांच्या औदार्याचा या पूर्वी जाहिर न केलेला उल्लेख तीने सर्वांच्या साक्षीने केला. शितल म्हणाली, २००४ मध्ये मी जेव्हा पॅराशुट जंम्पिग खेळात प्रवेश केला तेव्हा अशा प्रकारच्या खेळात सहभागी होणारी मी एकमेव भारतीय महिला होते. त्यावेळी माझ्याकडे स्वतःचा पॅराशुट नव्हता. आ. भवरलालजी यांना मी हा विषय सांगितला. जर स्वतःचा पॅराशुट असेल तर मी विश्वाला गवसणी घालणारे विक्रम करु शकेन असे म्हणाली. माझ्या मागणीवरुन आ. भवरलालजी यांनी मला स्वतःचा पॅराशुट उपलब्ध करुन दिला. आ. भवरलालजींच्या या औदार्यामुळे मी पुढील काळात अनेक विक्रम करु शकले, असे शितल म्हणाली.

जैन उद्योग समुहाने मला पॅराशुट दिला हे सुध्दा माध्यमांना माहित नाही, असे सांगत तीने जागतिक विक्रमांची माहिती दिली. शितलने दि. १७ सप्टेंबर २०१७ पर्यंत ७०० पॅराशुट जंम्प केलेल्या आहेत. त्यापैकी सर्वांत जास्त १३,५०० फुटावरून आणि त्यातील काही १८,००० फुटावरून व एक पॅराशुट जंम्प ऑक्सिजनच्या सहाय्याने ३० हजार फुटांवरून केली आहे. जगातील सात खंड उत्तर ध्रुव (आर्क्टिक), दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका), भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका येथे पॅराशुट जंम्प करणारी शितल एकमेव भारतीय महिला आहे. पॅराशुट जंम्पिंग प्रकारात शितलने १७ राष्ट्रीय आणि ६ जागतिक विक्रम केलेले आहेत.

शितल महाजन यांचा हा खेळ जेवढा जास्त रिस्की तेवढाच तो खर्चिक आहे. प्रत्येकवेळी नवे धाडस करायचे तर तिला प्रायोजक शोधावा लागतो. जळगावचा जैन उद्योग समुह नेहमी तिच्या मदतीला पुढे सरसावतो. शितलने अजून एक आठवण सांगितली. ती म्हणाली, मे २०१७ मध्ये मला कॅलिफोर्निया (यूएसए) त मध्ये ३०,५०० फुटांवरून हॅलो जंम्प (हाय अल्टीट्युड लो ओपनिंग जंम्प) प्रकारात सहभागी व्हायचे होते. यात मला अडचण होती. मी ती अडचण अशोकभाऊ जैन यांना सांगितली. त्यांनी ती अवघ्या ४ दिवसांत सोडवून मला कॅलिफोर्नियात जायला मदत केली.

शितलने जाहिरपणे सांगितलेल्या या दोन्ही आठवणी जैन समुहाच्या औदार्याच्या पूर्वी अन टोल्ड स्टोरिज होत्या ...

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved